
सामना ऑनलाईन । कोलकाता
हिंदुस्थान-श्रीलंका कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटीत सलग दुसऱ्या दिवशी पावसाने व्यत्यय आणला. कोलकाता कसोटीच्या दुसऱ्या दिवशी दोन तासांचा खेळ झाल्यानंतर पावसाने खेळ दिवसभरासाठी थांबला. पहिल्या दिवशी ११.५ षटकांत हिंदुस्थानने ३ बाद १७ एवढी मजल मारली होती. आज दुसऱ्या दिवशी ३२.५ षटकांचा सामना होऊ शकला. हिंदुस्थानने ५ बाद ७४ अशी मजल मारली आणि पावसामुळे खेळ दिवसभरासाठी थांबला. आता ४७ धावांवर नाबाद असलेल्या चेतेश्वर पुजारावर सगळी मदार उरली आहे.
‘सुरंगा’ने लावला हिंदुस्थानी फलंदाजीला सुरुंग
याआधी सकाळी सव्वानऊ वाजता खेळ सुरू झाला. अजिंक्य रहाणेच्या रूपाने हिंदुस्थानला चौथा धक्का बसला. रविचंद्रन अश्विनही अवघ्या ४ धावांची भर घालून तंबूत परतला. आता हिंदुस्थानची मदार पुजारा, साहा आणि इतर तळाच्या फलंदाजांवर आहे.
आपली प्रतिक्रिया द्या