‘यूएन’मध्ये इस्त्रायल व अमेरिकेविरुद्ध हिंदुस्थानचे मतदान, पॅलेस्टाईनला मदत

1666

संयुक्त राष्ट्र महासभेच्या बैठकीमध्ये हिंदुस्थानने पॅलेस्टाईनवासियांच्या ‘आत्म-संकल्प’ अधिकार संबधीत प्रस्तावाचे समर्थन केले आहे. हिंदुस्थानने आपला जुनाच पवित्रा कायम राखत पॅलेस्टाईनवासियांच्या ‘आत्म-संकल्प’ अधिकार संबधीत प्रस्तावास पाठिंबा दिला. हिंदुस्थानसह 165 देशांनी फिलिस्तीनच्या बाजूने मतदान केले. इस्त्रायल, अमेरिका, मायक्रोनेशिया, मार्शल आयलँडसह अन्य देशांनी याविरोधात मतदान केले. तर ऑस्ट्रेलिया, गुएंटेमाला आणि रवांडासह अन्य 9 देशांनी मतदानावर बहिष्कार टाकला.

संयुक्त राष्ट्र महासभेच्या बैठकीमध्ये उत्तर कोरिया, इजिप्त, निकारगुआ, झिम्बाब्वे आणि पॅलेस्टाईनने हा प्रस्ताव मांडला होता. मंगळवारी 19 नोव्हेंबरला या प्रस्तावावर मतदान पार पडले. यावेळी हिंदुस्थानने पॅलेस्टाईनच्या बाजूने मतदान केले.

हिंदुस्थान पूर्वीपासून पॅलेस्टाईनच्या समर्थनाच्या बाजूने आहे. 1974 मध्ये पॅलेस्टाईन मुक्ती संघटनेला (पीएलओ) मान्यता देणारा पहिला गैर-अरब देश होण्याचा मान हिंदुस्थानला मिळाला होता. त्यानंतर 1988 ला पॅलेस्टाईनला मान्यता देणाऱ्या देशांमध्ये हिंदुस्थानचे नाव आघाडीवर होते. यासह 1996 ला हिंदुस्थानने गाझामध्ये आपले रेप्रेझेंटेटिव्ह ऑफिसही उघडले होते, यानंतर 2003 ते रामाल्लाहला हलवण्यात आले.

palestine

संयुक्त राष्ट्राच्या मंचावरही हिंदुस्थानने कायम पॅलेस्टाईनचे समर्थन केले आहे. संयुक्त राष्ट्र महासभेच्या 53 व्या सत्रात हिंदुस्थानने पॅलेस्टाईनच्या आत्म निर्णय अधिकाराच्या बाजूने मतदान केले होते. 2003 मध्ये इस्त्रायलने एक भिंत उभी करण्याचा प्रस्ताव मांडला होता, याविरोधात हिंदुस्थानने मतदान केले होते. तसेच 2011 ला पॅलेस्टाईनला यूएनचे पूर्ण सदस्यत्व मिळण्याच्या मागणीचे समर्थन केले होते.

आपली प्रतिक्रिया द्या