हिंदुस्थान-ऑस्ट्रेलियामध्ये आज पहिली टी-२० लढत

सामना ऑनलाईन । रांची

हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. आजची पहिला सामना झारखंड क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियममध्ये स्टेडियममध्ये संध्याकाळी ७ वाजता खेळला जाणार आहे. एकदिवसीय मालिकेत ऑस्ट्रेलियाचा ४-१नं पराभव केल्यानं हिंदुस्थानी संघाचं आत्मविश्वास वाढला आहे. तर दुसरीकडे मोठ्या पराभवातून नव्या जोमानं उभं राहण्यासाठी ऑस्ट्रेलिया संघही तयार आहे.

शिखर धवन, दिनेश कार्तिक आणि आशीष नेहरा यांचे संघात पुनरागमन झाले आहे. शिखर धवन आणि रोहीत शर्मा ओपनिंग करतील. तर नेहराला जसप्रीम बुमराहची साथ मिळेल. मात्र या सामन्यात सगळ्यांचं लक्ष धोनीकडे असणार आहे. धोनीच्या घरच्या मैदानात धोनी काय चमक दाखवतो, याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांना आहे. हार्दिक पांड्याकडेही सर्वांचे लक्ष असेल. एकदिवसीय मालिकेत पांड्याची बॅट चांगलीच तळपली होती. तशाच कामगिरीची अपेक्षा संघ व्यवस्थापनाला त्याच्याकडून आहे.

संघ
हिंदुस्थान- विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, मनीष पांडे, केदार जाधव, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, महेंद्रसिंग धोनी, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, आशीष नेहरा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल.

ऑस्ट्रेलिया- स्टीव स्मिथ (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, जेसन बेहरेन्डॉर्फ, डॅन ख्रिस्तियन, नॅथन कोल्टर नाइल, पॅट कमिन्स, अ‍ॅरोन िफच, ट्रेव्हिस हेड, मोइसेस हेन्रिक्स, ग्लेन मॅक्सवेल, टीम पेन, केन रिचर्डसन, अ‍ॅडम झम्पा.