कोहलीला पर्थची ‘हिरवळ’ आवडली, कांगारुंच्या आशांना काडी लावली

37

सामना ऑनलाईन । पर्थ

पहिल्या कसोटीत यजमान ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्याने टीम इंडियाचा आत्मविश्वास उंचावला आहे. मालिकेतील दुसरा सामना पर्थच्या उसळी घेणाऱ्या मैदानावर होणार असल्याने टीम इंडियाच्या फलंदाजीचा येथे कस लागणार आहे. पर्थमध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ दादा समजला जातो. परंतु या दादागिरीला विराट सेना जशास तसे उत्तर देण्यासाठी सज्ज झाली आहे. अशातच कर्णधार विराट कोहलीने पर्थच्या खेळपट्टीवर असणाऱ्या हिरवळीला पाहून दिलेल्या वक्तव्याने कांगारुंच्या आत्मविश्वासाला तडे गेले आहेत.

आर.अश्विन, रोहीत शर्मा जायबंदी; जाडेजाची संघात वर्णी

एकेकाळी खेळपट्टीवरील हिरवळ पाहून हिंदुस्थानी खेळाडू नाक मुरडायचे. परंतु आता काळ बदलला असून मैदानावरील हिरवळ पाहून टीम इंडियाचे खेळाडू चिंतीत नसून उत्साहित झाले आहेत, असे विराट म्हणाला. तसेच आमच्याकडे वेगवान गोलंदाजीचे तुफानी आक्रमण असून जे विरोधी संघाला ऑलआऊट करण्याची क्षमता राखून आहे. तसेच अशी अपेक्षा करतो की खेळपट्टीवरील हिरवळ सामन्यादरम्यानही तशीच राहील, असेही विराट म्हणाला. कोहलीच्या या वक्तव्यामुळे पर्थवर टीम इंडियाच्या खेळाडूंना वेगवान गोलंदाजीची भिती दाखवण्याचे कांगारुंचे मनसुबे उधळले गेले आहेत.

कुंबळेचा पत्ता विराटनेच कट केला! डायना एडुल्जींचा गौप्यस्फोट

विराट पुढे म्हणाला की, ‘आम्ही पर्थवरील खेळपट्टी पाहिली तेव्हा त्यावर खूपच हिरवळ होती. या खेळपट्टीवर अॅडलेडपेक्षाही जास्त हिरवळ असून ती पाहून आम्हाला आनंद झाला आहे. ही खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी अधिक पोषक असणार आहे आणि आमच्याकडे चांगले वेगवान खेळाडू आहेत त्यामुळे आम्ही अधिक आत्मविश्वासने मैदानावर उतरू.’ तसेच तुम्ही जास्त धावा केल्या तरी विरोधी संघाच्या 20 विकेट घेण्याची क्षमता तुमच्या गोलंदाजांमध्ये असेल तरच तुम्ही सामना जिंकू शकता, असेही तो म्हणाला.

आपली प्रतिक्रिया द्या