IND Vs AUS – विजयापेक्षा हा क्षण पाहून टीम इंडियाचे चाहते भारावले, पाहा व्हिडीओ

टीम इंडियाने नवरात्रीच्या पूर्वसंध्येला ऑस्ट्रेलियावर 2-1 ने मात करत टी-20 मालिका जिंकली. टीम इंडियाच्या या विजयाचा संपूर्ण देशात जल्लोष साजरा करण्यात आला. सोशल मीडियावर टीम इंडिया ट्रेंडिंगवर होत आहे. यात एक व्हिडीओ देखील व्हायरल होत असून तो पाहून क्रिकेटचे चाहते भारावले आहेत.

टीम इंडियाचा सध्याचा कर्णधार रोहीत शर्मा व माजी कर्णधार विराट कोहली यांच्यात विस्तव जात नाही अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. विराट व रोहीत यांच्यात वाद झाला होता व ते एकमेकांच्या वाऱ्यालाही उभे राहत नाही अशी चर्चा होती. मात्र रविवारच्या सामन्यात काही वेगळेच चित्र पाहायला मिळाले.


सामना संपायला काही ओव्हर बाकी होते. विराट कोहली व रोहीत शर्मा हे ड्रेसिंगरुमच्या पायऱ्यांवर बाजूबाजूला बसले होते. जसा टीम इंडियाने सामना जिंकला या दोघांनी जल्लोष करत एकमेकांना मिठी मारली. त्यांच्या या जल्लोषाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून नेटकरी ते पाहून भारावले आहेत.