Ind vs Ban -पहिल्या दिवसाचा खेळ संपला, हिंदुस्थानकडे आघाडी

1263

हिंदुस्थानच्या क्रिकेट इतिहासात शुक्रवारी गुलाबी क्रांती घडली आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली ‘टीम इंडिया’ प्रथमच गुलाबी चेंडूवर बांगलादेशविरुद्ध कारकीर्दीतील पहिला दिवस-रात्र कसोटी सामना खेळण्यासाठी कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानावर उतरली आहे.

    • दिवसाअखेरीस हिंदुस्थान ३ गड्यांच्या मोबदल्यात १७४ धावांपर्यंत मजल
    • विराट कोहली नाबाद ५९ तर अजिंक्य रहाणे नाबाद २३ धावा

   • विराट कोहलीचं अर्धशतक

    • कोहलीसोबत पुजाराची ९४ धावांची भागीदारी
    • १०५ चेंडूत ८ चौकारांसह पुजाराच्या ५५ धावा
    • इबादतच्या गोलंदाजीवर शादमान इस्लामने घेतला चेतेश्वर पुजाराचा झेल
    • चेतेश्वर पुजाराचं अर्धशतक
    • रोहित शर्मा 21 धावा करून बाद
    • अवघ्या 14 धावा करून अल अमीन हुसैनच्या गोलंदाजीवर लगावलेला चेंडू मेहदी हसनने झेलल्यामुळे मयंक बाद
    • पाचव्या षटकाच्या चौथ्या चेंडुवर मयंक अग्रवाल झेलबाद झाला आहे.
    • तिसऱ्या षटकापर्यंत रोहित आणि मयंकने 21 धावांचा पल्ला गाठला आहे.
    • सलामीला रोहित शर्मा आणि मयंक अग्रवाल ही जोडी उतरली आहे.
    • हिंदुस्थानच्या फलंदाजीला सुरुवात झाली आहे.
    • बांग्लादेशचा डाव 106वर आटोपला आहे.
    • लंच ब्रेकपर्यंत सहा बाद 73 धावा
    • बांगलादेशला सहावा धक्का
    • उमेश यादव हॅटट्रिकवर

     • बांगलादेशला पाचवा धक्का, शदमन इस्लाम बाद
     • बांगलादेशला चौथा धक्का, इस्लाम बाद
     • मुशफिकूर रहिम मैदानावर
     • उमेश यादवने एकाच षटकात घेतल्या दोन  विकेट्स
     • मिथून शून्यावर बाद
     • टीम इंडियाची जबरदस्त गोलंदाजी, बांगलादेशला तिसरा धक्का
     • बांगलादेशला दुसरा धक्का, मोमिनूल बाद
     • इशांत शर्माने घेतली पहिली विकेट

     • बांगलादेशला पहिला धक्का, कायेश बाद
     • बांगलादेशकडून शदमान इस्लाम व इम्रूल कायेस मैदानावर
     • हिंदुस्थानचा संघ

     • बांगलादेशचा संघ

   • नाणेफेक जिंकून बांगलादेशचा प्रथम फलंदाजीचा निर्णय
आपली प्रतिक्रिया द्या