…तर विराट वाचला असता!

36

सामना ऑनलाईन । हैदराबाद

हिंदुस्थानच्या क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यानं बांगलादेशच्या विरुद्ध दमदार द्विशतक ठोकलं. तो या मैदानावर आणखी ‘विराट’ खेळी करेल अशी अपेक्षा होती. मात्र तो पायचित झाला. खरं तर विराटनं रिद्धिमान साहाचं ऐकलं असतं तर तो बाद झाला नसता.

विराटच्या द्विशतकानंतर मैदानात जबरदस्त उत्साह दिसत होता. १२६ वं षटक टाकण्यासाठी तैजुल इस्लामच्या हाती चेंडू देण्यात आला आणि त्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर विराट २०४ धावांवर पायचित झाला. पंचांनी बादची खूण केली आणि विराट तंबूच्या दिशेने चालू लागला. मैदानात टाळ्यांचा कडकडाट सुरू होता. रिद्धिमान साहाने विराटला रिव्ह्यू घेण्यास सांगितले. त्याला पंचांच्या निर्णयावर शंका होती. पण विराटनं ऐकलं नाही तो मैदान सोडून गेला. नंतर स्क्रीनवर रिप्ले दाखवण्यात आला तेव्हा विराट बाद नसल्याचं लक्षात आलं. पण विराटनं मैदान सोडलं होतं. विराटनं तेव्हा रिव्ह्यू घेतला असता तर नक्कीच त्यानं ‘विराट’ धावा केल्या असत्या, अशी भावना क्रिकेटप्रेमी व्यक्त करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या