डे-नाईट कसोटीचा उत्साह शिगेला, इडन गार्डनवर ‘सोल्ड आऊट’चा बोर्ड

828

टीम इंडिया आणि बांगलादेश संघात कोलकाताच्या इडन गार्डन मैदानावर 22 नोव्हेंबरपासून डे-नाईट कसोटी सामना खेळला जाणार आहे. टीम इंडियाचा हा पहिलाच कसोटी सामना असून खेळाडूंसह प्रेक्षकांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळेच डे-नाईट कसोटीचे सर्व तिकीट विकले गेले असून इडन गार्डनवर ‘सोल्ड आऊट’चा बोर्ड झळकला. बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली याने ही माहिती दिली आहे.

कोलकाताचे इडन गार्डन मैदान हिंदुस्थानातील सर्वाधिक आसनक्षमता असणाऱ्या मैदानांपैकी एक आहे. इडन गार्डनची प्रेक्षक क्षमता 67 हजार आहे. याच प्रसिद्ध मैदानात टीम इंडिया नवीन अध्यायाला सुरुवात करणार आहे. हा क्षण ‘याची देहा, याची डोळा’ अनुभवण्यासाठी प्रेक्षकही उतावळे आहेत. त्यामुळेच 22 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या या कसोटीचे सर्व तिकीट हातोहात विकले गेले आहे.

गुलाबी चेंडूने ‘निकाल’ लागतोच… वाच काय आहे डे-नाईट कसोटीचा इतिहास

बीसीसीआचा अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाला की, कोलकाता कसोटीचे सर्व तिकीट विकले गेले आहेत, त्यामुळे मी खूपच आनंदात आहे. पहिल्या चारही दिवसांचे तिकीट विकले गेले आहेत, असे गांगुली म्हणाला. बीसीसीआयच्या मुख्यालयाबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना गांगुलीने ही माहिती दिली.

स्वप्नात ‘पिंक बॉल’ पाहणाऱ्या अजिंक्य रहाणेला विराट, धवनने केले ट्रोल

दरम्यान, पहिल्या डे-नाईट कसोटीची तयारी अंतिम टप्प्यात आहे. बीसीसीआय आणि बंगाल क्रिकेट असोसिएशनने पहिल्या डे-नाईट कसोटीच्या आयोजनामध्ये कोणतीही कसर बाकी राहू नये म्हणून प्रयत्न केले आहेत. या ऐतिहासिक क्षणांचा साक्षिदार होण्यासाठी अनेक माजी खेळाडू, बीसीसीआयचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. तसेच बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांची देखील प्रमुख उपस्थिती असणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या