फायनलपूर्वी कोहलीच्या महिला खेळाडूंना खास शुभेच्छा

25

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

महिला विश्वचषकाची निर्णायक लढत काही तासांत सुरू होणार आहे. विश्वचषक उंचावण्यापासून हिंदुस्थानचा संघ एका पावलावर उभा आहे. फायनलपूर्वी हिंदुस्थानच्या पुरूष संघाचा कर्णधार विराट कोहलीने मिताली राज ब्रिगेडला शुभेच्छा दिल्या आहे. विराट कोहलीने इन्स्टाग्राम अकाउंटवर एका व्हिडिओ पोस्ट करत महिला संघाला फायनलसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

विराट कोहलीसह विरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण, सुरेश रैना, रोहित शर्मा, शिखर धवन, मोहम्मद कैफ आणि हिंदुस्थानची माजी कर्णधार अंजुम चोप्रा या खेळाडूंनी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी मिताली राज आणि खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत.

विश्वचषकामध्ये पहिल्या सामन्यात हिंदुस्थानने इंग्लंडचा पराभव केला होता, तसेच उपांत्यफेरीत बलाढ्य आणि सहा वेळच्या विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला पराभूत केले होते, त्यामुळे आजच्या सामन्यात इंग्लंडवर सर्वाधिक दबाव असणार आहे. तब्बल १२ वर्षांनंतर विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पोहोचलेल्या हिंदुस्थानला सामना जिंकूण विश्वचषक उंचावण्याची चांगली संधी आहे.

आपली प्रतिक्रिया द्या