राहुलचा ऐतिहासिक पराक्रम, अशी कामगिरी करणारा जगातील पहिला यष्टीरक्षक फलंदाज

17047

टीम इंडिया आणि न्यूझीलंड संघात दुसरा टी-20 सामना ऑकलंडमध्ये रंगला. या लढतीत टीम इंडियाने यजमान संघाचा 7 विकेट्सने दणदणीत पराभव करत पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. टीम इंडियाचा फॉर्मात असणारा यष्टीरक्षक फलंदाज के.एल. राहुल याने पुन्हा एक अर्धशतकी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. या अर्धशतकीय खेळीसह राहुलच्या नावावर एका अनोख्या विक्रमाची नोंद झाली आहे.

न्यूझीलंडने दिलेल्या 132 धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाने के.एल. राहुलच्या नाबाद 57 धावांच्या बळावर सामना जिंकला. राहुलने मालिकेत सलग दुसरे अर्धशतक ठोकत इतिहासात आपल्या नावाची नोंद केली. यष्टीरक्षक फलंदाज म्हणून खेळताना आपल्या पहिल्या दोन्ही लढतीत अर्धशतक ठोकण्याचा अनोखा पराक्रम राहुलने केला. विशेष म्हणजे अशी कामगिरी करणारा राहुल पहिलाच यष्टीरक्षक फलंदाज आहे. राहुलने पहिल्या लढतीत 56 आणि दुसऱ्या लढतीत नाबाद 57 धावांची खेळी केली.

#INDvNZ न्यूझीलंडमध्ये विजयाचा ‘तिरंगा’ फडकला, ऑकलंडमध्ये हिंदुस्थानची हॅटट्रीक

पाच डावात चार अर्धशतक
टी-20 क्रिकेटमध्ये के.एल. राहुल जबरदस्त फॉर्मात आहे. गेल्या पाच डावांमध्ये राहुलने चार अर्धशतक ठोकले आहे. राहुलने गेल्या पाच डावात 91, 45, 54, 56 आणि नाबाद 57 अशा एकूण 303 धावा चोपल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या