हिंदुस्थानचे ऐतिहासिक यश! न्यूझीलंडला घरच्या मैदानात 5-0 ने लोळवले

9442
Mt Maunganui: India players pose for a group photo as they celebrate a 5-0 series win during the Twenty/20 cricket international between India and New Zealand at Bay Oval in Mt Maunganui, New Zealand, Sunday, Feb. 2, 2020.AP/PTI(AP2_2_2020_000115B)

‘टीम इंडिया’ने न्यूझीलंड दौऱयावर घासून नव्हे, तर ठासून टी-20 क्रिकेट मालिका जिंकली. अखेरची आणि पाचवी लढत 7 धावांनी जिंकत हिंदुस्थानने यजमान न्यूझीलंडची 5-0 फरकाने चकचकीत धुलाई करीत निर्भेळ यश संपादन केले. न्यूझीलंडमध्ये एकही टी-20 मालिका न जिंकलेल्या ‘टीम इंडिया’ने यावेळी अजेय राहत मालिका जिंकून नव्या वर्षात नवा इतिहास रचला. जसप्रीत बुमराह अखेरच्या लढतीत ‘सामनावीर’ ठरला, तर लोकेश राहुलने मालिकावीराचा बहुमान संपादन केला.

दुबेने बिन्नीचा नकोसा विक्रम मोडला

नव्या दमाचा वेगवान गोलंदाज शिवम दुबेच्या दहाव्या षटकात न्यूझीलंडने 34 धावा ठोकल्या. यामुळे दुबे हा हिंदुस्थानी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात महागडा फलंदाज ठरला. याआधी 2016मध्ये स्टुअर्ट बिन्नीच्या एका षटकात वेस्ट इंडीजने 32 धावा कुटल्या होत्या. रविवारी शिवम दुबेने हा नकोसा विक्रम आपल्या नावे केला. रॉस टेलर व टिम शिफर्टने दुबेच्या षटकात 4 षटकार व 2 चौकार लगावले. यात एक चैकार गेलेल्या नो बॉलचाही समावेश आहे.

हिंदुस्थानचा परदेशात तिसरा क्लीन स्वीप

हिंदुस्थानने न्यूझीलंडला टी-20 मालिकेत 5-0 फरकाने लोळवून कारकिर्दीत तिसऱयांदा परदेशात क्लीन स्वीपचा पराक्रम केला. याआधी, ‘टीम इंडिया’ने 2015-16मध्ये ऑस्ट्रेलियाचा 2-0 फरकाने, तर 2019मध्ये वेस्ट इंडीजचा 3-0 फरकाने पराभव केला होता. टी-20 क्रिकेटमध्ये न्यूझीलंडविरुद्ध हिंदुस्थानची आधीची कामगिरी निराशाजनक होती. उभय संघांत झालेल्या 11 पैकी 8 लढती न्यूझीलंडने जिंकल्या होत्या. मात्र, यावेळी हिंदुस्थानने सलग पाच लढती जिंकून हे समीकरण आता 8-8 असे बरोबरीत केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या