हिंदुस्थानचा चौथ्या दिवशीच खेळ खल्लास

277

विराट कोहलीच्या हिंदुस्थानी क्रिकेट संघाला वेलिंग्टन येथे पार पडलेल्या पहिल्या कसोटीत दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. केन विल्यमसनच्या न्यूझीलंडने ही कसोटी दहा गडी राखून चौथ्या दिवशीच खिशात घातली. या कसोटीत नऊ फलंदाज बाद करणाऱया टीम साऊथीची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली. न्यूझीलंडने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली असून 29 फेब्रुवारीपासून ख्राईस्टचर्च येथे दुसऱया कसोटीला सुरुवात होणार आहे. आयसीसी कसोटी रँकिंग व टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये पहिल्या स्थानावर असलेल्या टीम इंडियासमोर आता मालिका वाचवण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. हिंदुस्थानच्या संघाला टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये पहिल्यांदाच पराभवाला सामोरे जावे लागले.

आपली प्रतिक्रिया द्या