हिंदुस्थान-पाकिस्तान लढतीचा जगभरात ‘विक्रम’, आकडेवारी वाचून थक्क व्हाल

1440

हिंदुस्थान आणि पाकिस्तान या दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील क्रिकेट सामना पाहण्यासाठी जगभरातील क्रीडाप्रेमी उत्सुक असतात. मैदानावरील दोन देशांमधील लढाई पाहण्यासाठी चाहत्यांच्या अक्षरश: उड्या पडतात. तिकीट मिळवण्यासाठी चाहते काहीही करण्यास तयार असतात. सामना सुरू होण्यापूर्वीच मैदान खचाखच भरलेले असते. त्यात जर दोन्ही संघ क्रिकेटचा ‘महाकुंभ’ वर्ल्डकपमध्ये आमनेसामने आले तर चाहत्यांसाठी ती एक पर्वणीच असते.

ICC Ranking – स्मिथ-कोहलीमधील अंतर झाले आणखी ‘विराट’

नुकताच इंग्लंडमध्ये झालेल्या एक दिवसीय वर्ल्डकपमध्ये हिंदुस्थान-पाकिस्तानमध्ये सामना झाला. आयसीसीच्या या स्पर्धेतील सामना जगभरात किती लोकांनी पाहिला याची आकडेवारी समोर आली आहे. जगभरामध्ये तब्बल 273 मिलयन (27.30 कोटी) लोकांनी पाहिला.

867 षटकानंतर त्याने कारकीर्दीतील पहिला ‘नो बॉल’ फेकला अन् विकेट गमावली

वर्ल्डकपमध्ये हिंदुस्थानने आपला इतिहास कायम राखत पाकिस्तानचा पराभव केला. सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडकडून पराभूत झाला आणि यजमान इंग्लंडने फायनलमध्ये न्यूझीलंडचा पराभव करत एक दिवसीय क्रिकेटमधील पहिला विश्वचषक जिंकला. परंतु या स्पर्धेतील सर्वाधिक पाहिलेला सामना म्हणून हिंदुस्थान-पाकिस्तान सामन्याची नोंद झाली आहे.

ind-v-pak

आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार, हिंदुस्थान आणि न्यूझीलंडमधील सेमीफायनल सामना 23.3 मिलियन क्रीडा चाहत्यांनी लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे पाहिला. यात हॉटस्टार आघाडीवर होते. तर जागतिक स्तरावर सर्वाधिक पाहिला गेलेला सामना म्हणून हिंदुस्थान-पाकिस्तान सामन्याची नोंद झाली. हा सामना तब्बल 273 मिलियन क्रीडा चाहत्यांना टीव्हीवर पाहिला. यातील 50 मिलियन चाहते हे लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे मिळाले आहेत. तर जगभरात 1.6 बिलियन (160 कोटी) लोकांनी यंदाचा वर्ल्डकप पाहिला आहे. 2015 मध्य़े हाच आकडा 706 मिलियन एवढा होता.

आपली प्रतिक्रिया द्या