पहिल्या T20 मध्ये हिंदुस्थानने दक्षिण आफ्रिकेचा केला 8 विकेट्सनी पराभव

ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या पहिल्या T20I सामन्यात हिंदुस्थानने दक्षिण आफ्रिकेचा 8 गडी राखून पराभव करत तीन सामन्यांच्या T20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. सूर्य कुमारने नाबाद 50 आणि राहुलने नाबाद 51 धावा करत हिंदुस्थानला विजय मिळवून दिला.

हिंदुस्थान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला सामना आज तिरुवनंतपुरम येथील ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. अर्शदीप सिंगच्या तीन विकेट्स आणि दीपक चहरच्या घातक गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिका 106 धावांमध्ये गारद झाली. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने 20 षटकांत 8 गडी गमावून 106 धावा केल्या होत्या. हिंदुस्थानने 2 गडी गमावत हे लक्ष्य पूर्ण केले.