गोलंदाजांच्या कामगिरीवर हिंदुस्थानी फलंदाजांनी ओतले पाणी

सामना ऑनलाईन । केपटाउन

दक्षिण आफ्रिकेत हिंदुस्थान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी दोन्ही संघांचे आघाडीचे फलंदाज अपयशी झाल्याचे दिसून आले. आधी भुवनेश्वर कुमारच्या ४ बळींच्या जोरावर हिंदुस्थानने ७३.१ षटकांत दक्षिण आफ्रिकेच्या संघाला २८६ धावांत रोखले. आफ्रिकेच्या सर्व फलंदाजांना पहिल्याच दिवशी बाद करण्याची कामगिरी हिंदुस्थानी गोलंदाजांनी केली. मात्र झटपट धावा करुन आफ्रिकेवर दबाव टाकण्याचे कोहली ब्रिगेडचे स्वप्न अपूर्णच राहिले.

दक्षिण आफ्रिकेप्रमाणेच हिंदुस्थानचे आघाडीचे फलंदाज झटपट तंबूत परतले. दिवसअखेर हिंदुस्थानने ३ बाद २८ धावा एवढीच मजल मारली. अद्याप कोहली ब्रिगेड २५८ धावांनी पिछाडीवर आहे. चेतेश्वर पुजारा (५ धावा) आणि रोहित शर्मा (शून्य धावा) मैदानात आहेत.

धावफलकः

दक्षिण आफ्रिका: फलंदाजी – डिन एल्गर (शून्य धावा), अॅडेन मारक्रम (५ धावा), हाशिम आमला (३ धावा), एबी डिव्हिलिअर्स (६५ धावा), ड्युप्लेसिस (६२ धावा), क्विंटन डी कॉक (४३ धावा), वेर्नोन फिलेंडर (२३ धावा), केशव महाराज (३५ धावा), कागिसो रबाडा (२६ धावा), डेल स्टेन (नाबाद १६ धावा), मॉर्केल (२ धावा).

हिंदुस्थानः गोलंदाजी – भुवनेश्वर कुमार (४ बळी), रविचंद्र अश्विन (२ बळी), मोहम्मद शमी (१ बळी), जसप्रीत बुमराह (१ बळी), हार्दिक पंड्या (१ बळी).

केशव महाराज याला अश्विनने धावचीत केले.

हिंदुस्थानः फलंदाजी – मुरली विजय (१ धाव), शिखर धवन (१६ धावा), विराट कोहली (५ धावा).

दक्षिण आफ्रिकाः गोलंदाजी – फिलेंडर, स्टेन आणि मॉर्केल यांना प्रत्येकी १ बळी.

आपली प्रतिक्रिया द्या