हिंदुस्थानचा पहिला डाव १७२ धावांत संपुष्टात

19

सामना ऑनलाईन । कोलकाता

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात हिंदुस्थानचा पहिला डाव १७२ धावांत आटोपला आहे. चेतेश्वर पूजाराने सर्वाधिक ५२ धावा केल्या. वृद्धीमान साहा २४, रविंद्र जाडेजा २२ आणि मोहम्मद शामी २४ धावांच्या जोरावर हिंदुस्थानी संघाला १७२ धावांची मजल मारता आली. मात्र श्रीलंकेच्या गोलंदाजीपुढे इतर हिंदुस्थानी खेळाडू टीकू शकले नाही. श्रीलंकेच्या सुरंगा लकमलने चार विकेट्स घेतल्या तर दासून शनाका दिलरुवान परेराने आणि लाहिरु गमगेने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.

सामन्याचे पहिले दोन दिवस पाण्यात गेले असच म्हणावं लागेल. कारण पहिल्या दिवशी केवळ ११.५ षटकांचा तर दुसऱ्या दिवशी आणखी २१ षटकांचा खेळ झाला. या ३२.५ षटकात हिंदुस्थानने ५ विकेट्स गमवत फक्त ७४ धावा केल्या होत्या. पाच बाद ७४ वरुन तिसऱ्या दिवशी पुढे सुरुवात केल्यानंतर हिंदुस्थानला तीन धक्के बसले. दुसऱ्या दिवशी ४७ धावांवर नाबाद असलेला चेतेश्वर पूजारा अर्धशतक झळकवल्यानंतर बाद झाला. साहा आणि जाडेजाने सातव्या विकेटसाठी सर्वाधिक ४८ धावांची भागीदारी केली.

आपली प्रतिक्रिया द्या