भुवनेश्वरकुमारचे पुनरागमन,विंडीजविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा

799

एम. एस. के. प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली हिंदुस्थानच्या सीनियर क्रिकेट निवड समितीने गुरुवारी आगामी वेस्ट इंडीजविरुद्धच्या वन डे व टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली. अष्टपैलू खेळाडू भुवनेश्वरकुमारचे हिंदुस्थानी संघात पुनरागमन झाले असून रोहित शर्मा व शिखर धवन या दोघांनाही संघात कायम ठेवण्यात आले आहे. आगामी धकाधकीच्या वेळापत्रकामुळे रोहित शर्माला विश्रांती देण्यात येईल अशी शक्यता होती, पण त्याला संघात कायम ठेवण्यात आले असून सुमार फॉर्ममधून जाणाऱया शिखर धवनलाही आणखी एक संधी देण्यात आली आहे. कर्णधार म्हणून विराट कोहलीचेही कमबॅक झाले आहे.

टीम इंडियाच्या या संघांमध्ये रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, शिवम् दुबे हे मुंबईचे तर केदार जाधव या महाराष्ट्राच्या खेळाडूचा समावेश करण्यात आला आहे. मोहम्मद शमी, भुवनेश्वरकुमार, दीपक चहर यांच्या खांद्यावर वेगवान गोलंदाजीची तर कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जाडेजा यांच्यावर फिरकी गोलंदाजीची मदार असणार आहे. खलील अहमद व कृणाल पांडय़ा यांना संघात स्थान देण्यात आलेले नाही.

आपली प्रतिक्रिया द्या