हैदराबादमध्ये ‘विराट’ शो! हिंदुस्थानचा विंडीजवर दणदणीत विजय

658

कर्णधार विराट कोहली व लोकेश राहुल यांच्या दमदार अर्धशतकांच्या जोरावर यजमान हिंदुस्थानी संघाने शुक्रवारी वेस्ट इंडीजवर सहा गडी व आठ चेंडू राखून दणदणीत विजय मिळवला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

वेस्ट इंडीजकडून मिळालेल्या 208 धावांचा पाठलाग करणाऱ्या हिंदुस्थानी क्रिकेट संघाने अवघे चार गडी गमावत विजयी लक्ष्य ओलांडले. खॅरी पियरने रोहीत शर्माला आठ धावांवर बाद करीत मोठा अडसर दूर केला. त्यानंतर लोकेश राहुल व विराट कोहली यांनी दुसऱ्या विकेटसाठी 100 धावांची दमदार भागीदारी रचत टीम इंडियाची आस दाखवली. खॅरी पियरने लोकेश राहुलला 62 धावांवर बाद केले आणि जोडी तोडली.

हिंदुस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. वेस्ट इंडीजने शिमरोन हेथमायरच्या 56 धावांच्या खेळीच्या जोरावर 207 धावा तडकावल्या. एविन लुईसने 40 धावांची, बी किंगने 31 धावांची, कायरॉन पोलार्डने 37 धावांची खेळी केली.

राहुल, कोहलीची दमदार अर्धशतके
विराट कोहलीने लोकेश राहुल बाद झाल्यानंतर रिषभ पंत (18 धावा), श्रेयस अय्यर (4 धावा) यांच्या साथीने टीम इंडियाला विजय मिळवून दिला. विराट कोहलीने 50 चेंडूंत सहा षटकार व सहा चौकार मारत नाबाद 94 धावांची खेळी साकारली आणि यजमान देशाचा विजय निश्चित केला.

आपली प्रतिक्रिया द्या