हिंदुस्थानी महिलांचे घवघवीत यश, वेस्ट इंडीजचा 5-0 अशा फरकाने धुव्वा

हिंदुस्थानच्या महिला क्रिकेट संघाने वेस्ट इंडीजमध्ये घवघवीत यश संपादन केले. वेदा कृष्णमूर्ती, जेमिमा रॉड्रिग्स यांची दमदार अर्धशतके आणि अनुजा पाटीलसह सर्व गोलंदाजांनी केलेल्या प्रभावी कामगिरीच्या जोरावर हिंदुस्थानच्या महिला संघाने बुधवारी मध्यरात्री येथे झालेल्या अखेरच्या लढतीत वेस्ट इंडीजवर 61 धावांनी दणदणीत विजय मिळवला आणि पाच सामन्यांच्या ट्वेंटी-20 मालिकेत 5-0 असे निर्भेळ यश संपादन केले. हिंदुस्थानकडून मिळालेल्या 135 धावांचा पाठलाग करणाऱया वेस्ट इंडीजला 20 षटकांमध्ये 7 बाद 73 धावांपर्यंतच मजल मारता आली. ऑफस्पिनर अनुजा पाटील हिने 3 धावा देत 2 फलंदाजांना बाद केले.

आपली प्रतिक्रिया द्या