२०२४ पर्यंत हा देश हिंदू राष्ट्र बनणार!- भाजप आमदार

सामना ऑनलाईन । बलिया

भाजपचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी २०२४ पर्यंत हा देश हिंदू राष्ट्र होणार असल्याचा दावा केला आहे. दरम्यान, भाजपने त्या आमदाराचे हे वैयक्तिक विधान असल्याचे सांगत हात वर केले आहेत. त्यांनी मुस्लिमांच्या देशभक्तीवर निशाणा साधत म्हटले की, खूप कमी मुस्लिम राष्ट्रभक्त आहेत.

२०२४ रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला १००वर्षे पूर्ण झाल्यावर हिंदुस्थान हिंदू राष्ट्र बनणार आहे. तसेच हिंदू राष्ट्र बनल्यावर जे मुस्लिम आमची संस्कृती आत्मसात करतील ते हिंदुस्थानमध्ये राहू शकतील, असे विधान त्यांनी केले. यानंतर राहुल यांना कधी हिंदुस्थानींचे दुःख समजू शकत नाही अशी टीका त्यांनी केली.