दहशतवाद संपेपर्यंत हिंदुस्थान-पाकिस्तान सामन्यांवर गंडांतर!: क्रीडा मंत्री

31

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

दहशतवाद आणि क्रिकेट हातात-हात घालून एकत्र चालू शकत नाही; असे क्रीडामंत्री विजय गोयल म्हणाले. ते राजधानी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. पाकिस्तानच्या हिंदुस्थानविरोधी दहशतवादी कारवाया वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर गोयल यांनी हे महत्त्वाचे वक्तव्य केले.

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत ४ जून रोजी हिंदुस्थान आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये सामना होणार आहे. इंग्लंडमधील बर्मिंगहम (Birmingham) येथील मैदानावर हा सामना रंगणार आहे. त्यापूर्वी क्रीडामंत्र्यांनी केलेले वक्यव्य म्हणजे हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये द्विपक्षीय मालिकेसाठी आग्रह धरणाऱ्यांच्या गालावर जोरदार थप्पड आहे.

बीसीसीआय आणि पीसीबीच्या अधिकाऱ्यांची सोमवारी दुबईमध्ये बैठक होणार आहे. यावेळी दोन्ही देशांमध्ये त्रयस्थ ठिकाणी मालिका खेळण्यासंदर्भात चर्चा होणार असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. ही बैठक होण्याआधीच क्रीडामंत्र्यांनी कठोर भूमिका जाहीर केल्यामुळे हिंदुस्थान-पाकिस्तान सामन्यांवर गंडांतर येण्याची शक्यता आहे.

याआधी बीसीसीआयचे कार्यवाहक सचिव अमिताभ चौधरी यांनी सरकारची परवानगी असेल तर पाकिस्तानसोबत द्विपक्षीय मालिका खेळणे शक्य आहे, असे सांगितले होते.

आपली प्रतिक्रिया द्या