कटकमध्ये हिंदुस्थानने इंग्लंडला पटकले!

सामना ऑनलाईन । कटक

हिंदुस्थानने कटक वन डे १५ धावांनी जिंकली आणि मालिका २-० अशी खिशात घातली. युवराजने वन डे कारकिर्दीतली सर्वोत्तम कामगिरी करत १५० धावा केल्या. माजी कर्णधार धोनीने त्याला उत्तम साथ देत १३४ धावा केल्या. युवीचे १४ वे आणि धोनीचे दहावे शतक यांच्या जोरावर हिंदुस्थानने ३८१ धावांची मजल मारली आणि इंग्लंडला ५० षटकांत ८ बाद ३६६ वर रोखून सामना तसेच मालिका जिंकली.

इंग्लंडच्यावतीने मॉर्गनने सर्वाधिक १०२ धावा केल्या. रॉय (८२ धावा), अली (५५ धावा) आणि रूट (५४ धावा) यांनी आव्हानाचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र कटकच्या मैदानातील सर्वात मोठी धावसंख्या उभारणाऱ्या हिंदुस्थानच्या कोहली ब्रिगेडपुढे अखेर त्यांनी हार मानली.