पुन्हा नंबर वन! कांगारूंचा वन डे मालिकेत ४-१ ने धुव्वा

25

सामना ऑनलाईन । नागपूर

टीम इंडियाने पाचव्या व अखेरच्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात स्टीव्हन स्मिथच्या ऑस्ट्रेलियाचा 7 विकेट आणि 43 चेंडू राखून धुव्वा उडविला. या विजयासह हिंदुस्थानने 4-1 फरकाने मालिका जिंकली व पुन्हा एकदा नंबर वनचे सिंहासन काबीज केले. 125 धावांची झंझावाती खेळी करणारा रोहित शर्मा सामन्याचा तर हार्दिक पांडय़ा मालिकेचा मानकरी ठरला.

आपली प्रतिक्रिया द्या