हिंदुस्थानी महिलांचे निर्भेळ यश, दक्षिण आफ्रिकेचा 3-0 ने धुव्वा

778

ट्वेण्टी-20 मालिकेत घवघवीत यश संपादन केल्यानंतर हिंदुस्थानच्या महिला क्रिकेट संघाने सोमवारी येथे झालेल्या अखेरच्या वन डे लढतीत पाहुण्या दक्षिण आफ्रिकेला सहा धावांनी पराभूत करीत याही मालिकेत 3-0 अशा फरकाने निर्भेळ यश संपादन केले. डावखुरी फिरकी गोलंदाज एकता बिष्ट हिची प्लेअर ऑफ दी मॅच म्हणून निवड करण्यात आली.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या हिंदुस्थानचा डाव 146 धावांमध्येच गडगडला. मात्र दक्षिण आफ्रिकेला 140 धावांपर्यंतच मजल मारता आली. एकता बिष्ट हिने 32 धावा देत तीन फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. दरम्यान, याआधी हिंदुस्थानला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. हरमनप्रीत कौरने पाच चौकारांसह 38 धावांची आणि शिखा पांडे हिने सहा चौकारांसह 35 धावांची खेळी केली.

सचिन तेंडुलकरने केले कौतुक

आपली प्रतिक्रिया द्या