हिंदुस्थानचा दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय; मालिकेत २-०नं आघाडी

11

सामना ऑनलाईन । सेन्चुरियन

हिंदुस्थाननं दक्षिण आफ्रिकेला धुळ चारत दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ९ गडी राखून दणदणीत विजय मिळवला आहे. दक्षिण आफ्रिकेनं दिलेलं ११९ धावांच सोपं आव्हान हिंदुस्थानी संघानं अवघ्या २०.३ ओव्हर्समध्ये पूर्ण केलं आहे. या सामन्यातील विजयानंतर हिंदुस्थाननं ६ सामन्यांच्या मालिकेत २-०नं आघाडी घेतली आहे. हिंदुस्थानकडून खेळताना शिखर धवनने सर्वाधिक ५१ धावांची आणि कर्णधार विराट कोहलीनं ४६ धावांची नाबाद खेळी केली.

युजवेंद्र चहल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यातील हिरो ठरला, तर कुलदीप यादवनेही त्याला चांगली साथ दिली. चहल-कुलदीपच्या फिरकी पुढे आफ्रिकेचा अख्खा संघ ११८ धावांत गारद झाला. आफ्रिकेच्या सात फलंदाजांना तर दोन आकडी धावसंख्याही गाठता आली नाही. यासामन्यात चहलनं सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या तर कुलदीप यादवन ३ विकेट घेतल्या. भुवनेश्वर आणि बुमराहनं प्रत्येकी १-१ विकेट घेतल्या.

पहिल्या दोन सामन्यांतील विजयानंतर हिंदुस्थानी संघाचा आत्मविश्वास नक्कीच वाढला आहे. त्यामुळे कसोटी मालिकेतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी हिंदुस्थानी संघ आता सज्ज झाला आहे असंच म्हणावं लागेल.

आपली प्रतिक्रिया द्या