हवाईदल ‘हिंदुस्थान एअरोनॉटिक्स’कडून घेणार 83 ‘तेजस’ लढाऊ विमाने

335

हिंदुस्थानचे हवाईदल (आयएएफ) आणि हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) यांच्यात देशांतर्गत संरक्षणक्षेत्रातील मोठा करार झाला आहे. हवाईदल ‘हिंदुस्थान एअरोनॉटिक्स’कडून सपोर्ट पॅकेजसह 83 सिंगल सीटर ‘तेजस’ लढाऊ विमाने विकत घेणार आहे. यापूर्वी 83 तेजस लढाऊ किमानांसाठी 56,500 कोटी रुपये मोजावे लागणार होते. मात्र, आता हा संपूर्ण व्यवहार 39 हजार कोटी रुपयांमध्ये अंतिम झाला आहे. या कराराचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे.

वर्षभरातील चर्चेच्या वेगवेगळ्या फेऱ्यांनंतर ‘तेजस’ विमानांची किंमत 17 हजार कोटी रुपयांनी कमी झाली आहे. 83 ‘तेजस मार्क-1 ए’ विमानांच्या निर्मितीसाठी ‘एचएएल’ने प्रारंभी सांगितलेल्या किमतीमुळे संरक्षण मंत्रालय आणि हवाईदलाला मोठा धक्का बसला होता. आता 39 हजार कोटी रुपयांना अंतिम व्यवहार निश्चित झाला आहे.

कराराची वैशिष्टय़े
आर्थिक वर्ष संपण्याआधी म्हणजेच 31 मार्चपूर्वी या कराराच्या फाइलवर केंद्राकडून शिक्कामोर्तब होणे गरजेचे आहे.
नोव्हेंबर 2016मध्ये सर्वप्रथम संरक्षण खरेदी परिषदेने (डीएसी) 49,797 कोटींना 83 ‘तेजस’ विमानांच्या खरेदी व्यवहाराला मंजुरी दिली होती. मात्र, त्यानंतर ‘एचएएल’ने किंमत वाढवून 56 हजार कोटी केली.
सध्या हवाईदलाकडे 30 स्क्वाड्रन्स आहेत. चीन आणि पाकिस्तानचा एकाच वेळी मुकाबला करण्यासाठी 42 स्क्वाड्रन्सची आवश्यकता आहे.
या वर्षी मे महिन्यात पहिली चार ‘राफेल’ किमाने हिंदुस्थानात दाखल होतील. उर्वरित 32 ‘राफेल’ फायटर किमाने 2022पर्यंत टप्प्याटप्प्याने हवाईदलात दाखल होतील.

आपली प्रतिक्रिया द्या