सीमेवर रात्रीही हिंदुस्थानचा कडक पहारा, अपाचे तैनात

1028

गलवान खोऱ्यात हिंदुस्थानच्या वीर जवानांनी प्राणांचीबाजी लावत सीमेचे रक्षण केले. या घटनेनंतर हिंदुस्थान-चीन सीमाभागात प्रचंड तणाव आहे. चीनने सैन्य मागे घेण्यास सुरुवात केली आहे, मात्र पुर्वानुभव लक्षात घेता हिंदुस्थान दक्ष आहे. रात्रीच्या वेळी सीमेवरील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी लडाखमध्ये अपाचे अटॅक हेलिकॉप्टर तैनात केले आहे. 2 मिनिटात 1200 राउंड फायर करण्याची या हेलिकॉप्टरची क्षमता आहे.

‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने या संदर्भातील वृत्त देतानाच फोटो देखील ट्विट केले आहेत. रात्रीच्या अंधारात या भागात सीमेवर लक्ष ठेवणे हे जिकरीचे काम आहे. जवान अशा परिस्थितीत देखील इथे कार्यरत असतात. अपाचे हेलिकॉप्टर तैनात करण्यात आल्याने रात्रीच्या वेळी सीमेवर लक्ष ठेवणे किंवा हल्ला परतवून लावणे शक्य होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या