हवाई दलाचे विमान घसरले; मुंबई विमानतळावर गोंधळ

16

सामना ऑनलाईन, मुंबई

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी रात्री हवाई दलाचे एएन-32 हे मालवाहतूक विमान घसरले. या अपघातानंतर बुधवारी पहाटेपासून सुमारे 50 विमान उड्डाणे रद्द करण्यात आली. विमानाची मुख्य धावपट्टी बंद ठेवण्यात आल्याने उड्डाणे दुसऱ्या धावपट्टीवर वळवण्यात आली. उड्डाणे अर्ध्या तास उशिराने सुरू होती. यामुळे प्रवाशांना प्रचंड मनःस्ताप सहन करावा लागला.

आपली प्रतिक्रिया द्या