Video – तब्बल 10 महिन्यानंतर हिंदुस्थान-चीन सीमेवरील सैन्य मागे घेतलं, लष्काराने जारी केले फुटेज

china-going-back

हिंदुस्थान आणि चीन सीमेवरील सैन्य माघारी घेण्यास दोन्ही देशांनी सुरुवात केली आहे. पँगाँग त्सो तलावाच्या दक्षिण आणि उत्तरेकडेल किनाऱ्यावरुन सैन्य माघारी घेतले जात असून हिंदु्स्थानच्या लष्कराने याचे फोटो आणि प्रसिद्ध करून याबाबत माहिती दिली आहे. याआधी संसदेत बोलताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी चर्चेच्या नवव्या फेरीनंतर शांतता प्रस्थापित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती दिली होती.

लडाख पूर्व भागात गेल्या वर्षी हिंदुस्थान आणि चीनचे सैन्य आमनेसामने आले होते. यावेळी झालेल्या झटापटीत हिंदु्स्थानचे 20 शहीद झाले होते, तर चीनचे 40 हून अधिक जवान मारले गेले होते. तेव्हापासून या भागात तणाव वाढला होता. दोन्ही देशांनी जवानांची संख्या, आधुनिक हत्यारांची तैनाती केली होती. परंतु या दरम्यान चर्चेच्या फेऱ्याही सुरू होत्या. अखेर नवव्या चर्चेनंतर दोन्ही देशांनी सैन्य माघारी घेण्याची ठरवले.


View this post on Instagram

A post shared by Saamana (@saamanaonline)

Indian and Chinese troops and tanks disengaging from the banks of Pangong lake area in Eastern Ladakh where they had been deployed opposite each other for almost ten months now.

आपली प्रतिक्रिया द्या