मोबाईलवर पॉर्न पाहणाऱ्यांची संख्या झपाझप वाढली

प्रातिनिधीक फोटो

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानमध्ये ‘अॅडल्ट कंटेंट’चा खप दुपटीने वाढला असून मोबाईलवर पॉर्न पाहणाऱ्यांची संख्या झपाझप वाढत आहे. स्वस्तात मिळणारे स्मार्टफोन आणि मोफत इंटरनेट सेवा यामुळे मिळेल तिथे लोक पॉर्न पाहू लागले आहेत. हिंदुस्थानींना पॉर्नच व्यसनच जडले आहे, असे पोर्नहब वेबसाईटने आपल्या अहवालात म्हटले आहे.

या वेबसाईटनुसार हिंदुस्थानमध्ये पॉर्न पाहाण्याची किमान वेळ ८.२२ मिनिट आहे. रोज पॉर्नसाईटवर जाण्याची वेळ ७.३२ मिनिट आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीने काही दिवसांपूर्वी एनालिटीक्स कंपनी ‘विडूली’चे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी सुब्रत कौर यांची मुलाखत घेतली होती. त्यावेळी झालेल्या चर्चेत २०१६-१७ मध्ये पॉर्न कंटेटच्या विक्रित दुपटीने वाढ झाल्याचे समोर आले. मोबाईलमुळेच हे प्रमाण वाढले आहे.

यावर्षी जानेवारी महिन्यात प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात अमेरिका व ब्रिटन नंतर पॉर्न पाहाण्यात हिंदुस्थानचा तिसरा क्रमांक लागतो. त्यातही चाईल्ड पॉर्नसाईट शोधण्यात व शेअर करण्यात अमृतसर, दिल्ली व लखनौ ही शहरे अग्रेसर असल्याचे यात सांगण्यात आले होते. पॉर्न पाहाण्यात हिंदुस्थानने कॅनडालाही मागे टाकले आहे. असेही यात स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, पॉर्नवर लगाम लावण्यासाठी सरकारने प्रयत्नही केला. पण त्यास देशवासियांनी विरोध दर्शवल्याने सरकारला एक पाऊल मागे यावे लागले आहे. तरीही चाईल्ड पॉर्न उपलब्ध करुन देणाऱ्या ८०० हून जास्त वेबसाईटला सरकारने ब्लॉक केले आहे. पण विविध मार्गाने लोकं चाईल्ड पॉर्न पाहात आहेत, असे पोर्नहब वेबसाईटने म्हटले आहे.