हेलिकॉप्टर कोसळून दोन पायलटचा मृत्यू

हिंदुस्थानी लष्कराचे चित्ता हेलिकॉप्टर गुरुवारी सकाळी अरुणाचल प्रदेशातील मंडला हिल भागात क्रॅश झाले. या अपघातात दोन्ही पायलटचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर दोन्ही पायलट बेपत्ता झाले होते. त्यानंतर लष्कर, सशस्त्र सीमा बल आणि आयटीबीपीची पाच पथके शोधासाठी पाठवली होती. दरम्यान, या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. बोमडिलाजवळ सॉर्टी ऑपरेशनसाठी उड्डाण करणाऱ्या चिता हेलिकॉप्टरचा गुरुवारी सकाळी 9.15 वाजताच्या सुमारास या एअर ट्रफिक कंट्रोलशी (एटीसी) संपर्क तुटला होता.