बालाकोटनंतर पाकिस्तानशी पारंपारिक युद्धासाठी तयार होतो – लष्करप्रमुख

486

पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने पुलवामामध्ये लष्कराच्या ताफ्यावर हल्ला केल्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तानमध्ये घुसून एअर स्ट्राईक केला होता. बालाकोटमध्ये केलेल्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तान हल्ला करण्याची शक्यता होती. तसा प्रयत्नही झाला परंतु वायूसेनेने तो निष्फळ ठरवला. पाकिस्तानने अधिक आक्रमक भूमिका घेत हल्ला केला असता तर आम्ही पारंपारिक युद्धासाठी तयार होतो, असे हिंदुस्थानचे लष्करप्रमुख बिपिन रावत सोमवारी म्हणाले.

पुलवामा हल्ल्यानंतर हिंदुस्थानने हवाई हल्ला करण्यासह अन्य पर्यायांचाही विचार केला होता. बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक नंतर लष्करप्रमुख बिपिन रावत यांना केंद्र सरकारला आम्ही कोणत्याही परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी सज्ज असल्याचे म्हटले होते. तसेच पाकिस्तानमध्ये घुसून त्यांना चित करण्याची तयारी असल्याचेही ते म्हणाले होते.

दरम्यान, 2016 मध्ये उरी येथे झालेल्या आणि पुलवामा येथे झालेल्या लष्करी जवानांवरील भ्याड हल्ल्यानंतर हिंदुस्थानी लष्कराने आधुनिकीकरणावर जोर देत 11 हजार कोटींचे शस्त्रास्त्र खरेदी केले. यातील 95 टक्के शस्त्र हिंदुस्थानला मिळाले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या