सीमेवर पाकडे, हिंदुस्थानी लष्कर सज्ज

2014

‘सीमेवर कोणत्याही प्रकारच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी हिंदुस्थानी लष्कर सज्ज आहे. काळजी करण्याचे काही कारण नाही,’ असे लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी आज स्पष्ट केले.

कश्मीरमधून 370 कलम हटवल्यानंतर पाकिस्तानने लडाखजवळच्या सीमेवर सैन्य आणि युद्ध साहित्याची जमवाजमव सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी सांगितले, ‘सीमेवरच्या सर्व हालचालींवर आमचे बारीक लक्ष आहे. काही अनुचित घडलेच तर आम्ही सज्ज आहोत,’ असेही ते म्हणाले. ‘पाकिस्तानने सीमेवर सैन्य वाढवणे आणि तशा हालचाली करणे, अशा गोष्टी प्रत्येक देश करत असतो. ही सामान्य गोष्ट आहे. पण पाकिस्तानने काही आगळीक केली तर त्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल,’ असेही रावत म्हणाले.