पतियाळामध्ये सैन्याचे विमान कोसळले, दोन जखमी

328

गोव्याच्या किनार्‍यावर नौदलाचे विमान कोसळल्याची घटना ताजी असताना पंजाबमधील पतियाळामध्ये हिंदुस्थानी सैन्याचे ट्रेनिंग विमान कोसळले आहे. प्राथमिक माहितीनुसार या अपघातात विंग कमांडर चीमा आणि एक कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. सैन्याच्या भागातच हा अपघात झाल आहे. दोन्ही जवानांना राजेंद्र इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.

रविवारी हिंदुस्थानी नौदलाच्या मिग-29के विमानाला रविवारी अपघात झाला होता. गोव्याच्या किनार्‍यापासून काही अंतरावर अरबी समुद्रात लढाऊ विमान कोसळले होते. विमानातून वैमानिक सुरक्षितरीत्या बाहेर पडल्याने त्याचे प्राण वाचले.

आपली प्रतिक्रिया द्या