VIDEO : पाकिस्तानकडून नागरी वस्त्यांवर गोळीबार, 50 शाळकरी मुलांना जवानांनी वाचवले

893

पाकिस्तानने शनिवारी पूँछ जिल्ह्यातील बालाकोट, मानकोट, मेंढर सेक्टरमधील नागरी वस्त्यांवर गोळीबार करत मोर्टार डागले. यावेळी बालाकोटमधील सनडोट गावातील एका शाळेत पन्नास विद्यार्थी अडकले होते. मात्र जवानांनी प्रसंगावधान राखत त्या विद्यार्थ्यांची सुटका करत त्यांना बुलेटप्रुफ गाडीत बसवले. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.

शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास पाकिस्तानी लष्कराने बालाकोट, मानकोट, मेंढर सेक्टरमधील सीमेलगतच्या नागरी वस्त्यांवर गोळीबार करत मोर्टार डागले. पाकड्यांच्या या गोळीबाराला हिंदुस्थानी लष्कराने देखील चोख प्रत्युत्तर दिले.

आपली प्रतिक्रिया द्या