पुन्हा सर्जिकल स्ट्राईक, ४ जवानांच्या मृत्यूचा हिंदुस्थानी लष्कराने बदला घेतला

प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन, श्रीनगर

शनिवारी हिंदुस्थानी लष्कराच्या एका तुकडीवर कश्मीर खोऱ्यातील राजौरी इथे पाकिस्तानी सैनिकांनी हल्ला केला होता, यामध्ये नागपूरच्या मेजर प्रफुल्ल मोहरकर यांच्यासह एकूण ४ जवानांचा मृत्यू झाला होता. पाकड्यांच्या नालायक आणि भेकड कृत्यामुळे संतापाने धुमसत असलेल्या हिंदुस्थानी लष्कराने या हत्येचा बदला घेतला.

सर्जिकल स्ट्राईक! ‘त्या’ ४५ मिनिटात नेमकं घडलं काय

पाकव्याप्त कश्मीरमध्ये घुसून आपल्या जवानांनी  आपल्या ताब्य़ात असलेल्या पुंछ जिल्ह्याला लागून असलेल्या ‘राखचिकरी’ भागात रौद्ररुप दाखवलं. जवानांनी केलेल्या या सर्जिकल स्ट्राईकमध्ये ३ पाकिस्तानी सैनिकांना कंठस्नान घालण्यात आलं आहे, तर काही सैनिक जखमी झाल्याचं वृत्त आहे. हिंदुस्थानी सैन्याने हे पाऊल शनिवारी आपल्या जवानांवर केलेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी उचलल्याचं एएनआय या वृत्तसंस्थेने म्हटलं आहे.