पाकिस्तानच्या गोळीबारात हिंदुस्थानच्या जवानाला हौतात्म्य

596
Indian army havildar-dipak-karki

पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत केलेल्या गोळीबारात सोमवारी हिंदुस्थानच्या जवानाला हौतात्म्य आले आहे. हिंदुस्थानच्या लष्करात हवालदार पदावर कार्यरत असलेले दीपक कर्की हे नौशेरा सेक्टर भागातील नियंत्रण रेषेच्या पोस्टवर सीमांचे रक्षण करत होते. आज पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केला. यामध्ये दीपक कर्की यांना हौतात्म्य आले.

गेल्या आठवड्यात गलवानच्या खोऱ्यात चिनी सैन्याला रोखताना हिंदुस्थानच्या 20 जवानांना वीर मरण आले होते. त्यामुळे हिंदुस्थानमध्ये चीन विरोधात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. चीन विरोधात देशाने कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. मात्र असे असतानाच पाकिस्तानने देखील आपल्या कुरापती सुरूच ठेवल्या आहेत. दरम्यान, वेरीनागच्या जंगलात दहशतवादी लपल्याची माहिती असून या भागात संरक्षणदलाची संयुक्त कारवाई सुरू असून चकमक सुरू आहे.

जम्मू-कश्मीर – वेरीनाग जंगलात दहशतवादी लपल्याची माहिती, चकमक सुरू

आपली प्रतिक्रिया द्या