हिंदुस्थानचा पाकिस्तानवर ‘काबिल’-ए-तारिफ विजय, टी-२० वर्ल्ड कप जिंकला

33

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानच्या दृष्टिहिनांच्या संघाने आज धडाकेबाज खेळ करत टी-२० वर्ल्ड कप जिंकला. विशेष बाब म्हणजे हिंदुस्थानी संघाने आपला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला ९ गडी राखून पराभूत केले. गेल्यावर्षी देखील हिंदुस्थानच हा टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचा विजेता ठरला होता.

हिंदुस्थान आणि पाकिस्तान आमने-सामने म्हटल्यावर प्रत्येकात जोश चढतो. दोन्ही संघ पूर्ण तयारीनेच मैदानात उतरतात. यंदा पाकिस्तान टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील साखळी फेरीत एकही सामना न हरता अंतिम फेरीत पोहोचला होता. साखळी फेरीत त्यांनी हिंदुस्थानलाही सात गडी राखून पराभूत केले होते. त्यामुळे पाकिस्तानच वर्ल्ड कप जिंकेल असे म्हटले जात होते. मात्र पाकिस्तानी संघाने हिंदुस्थानसमोर ठवलेले १९८ धावांचे लक्ष्य पार केले आणि विजय मिळवला. आक्रमक खेळामुळेच हिंदुस्थानला पुन्हा एकदा वर्ल्ड कपवर आपले नाव कोरता आले.

आपली प्रतिक्रिया द्या