विजयीवीरांचा महिंद्राकडून सन्मान, सहा थार कार बक्षीस म्हणून भेट

ऑस्ट्रेलियात भीमपराक्रम करणाऱया हिंदुस्थानच्या सहा युवा क्रिकेटपटूंना ऑटोमोबाईल क्षेत्रातील दिग्गज आनंद महिंद्रा यांच्याकडून कार भेट देण्यात येणार आहे. शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, टी. नटराजन या सहा खेळाडूंना थार एसयूव्ही भेट देण्याची घोषणा आनंद महिंद्रा यांच्याकडून शनिवारी करण्यात आली.

आनंद महिंद्रा यांनी ट्विट करताना म्हटले की, हिंदुस्थानच्या सहा खेळाडूंनी ऑस्ट्रेलियातील पदार्पणाच्या मालिकेत ठसा उमटवला. शार्दुल ठाकूरने याआधी एक सामना खेळला होता. पण दहा चेंडूंनंतरच त्याला बाहेर व्हावे लागले होते. त्यामुळे तसा तोही नवखाच. या सहा क्रिकेटपटूंनी जबरदस्त कामगिरी करीत हिंदुस्थानातील युवा खेळाडूंसमोर आदर्श उभा केला.

पुढे ते म्हणाले, या सर्व खेळाडूंनी मोठी झेप घेतली. समोर आलेल्या आव्हानांचा समर्थपणे मुकाबला केला. हिंदुस्थानातील असंख्य युवकांसाठी ते प्रेरणा ठरलेत. त्यामुळेच मी सर्वांना नवीन कार भेट म्हणून देत आहे, असे कौतुकोद्गारही यावेळी आनंद महिंद्रा यांनी यावेळी काढले.

आपली प्रतिक्रिया द्या