Video- हिंदुस्थानी संघाचा क्रिकेटच्या मैदानात भलताच ‘खेळ’

28

सामना ऑनलाईन । सेन्चुरियन

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील पराभव विसरून हिंदुस्थानी संघ मैदानात सराव करताना दिसत आहे. दुसऱ्या सामन्यात पुनरागमन करण्याचा हिंदुस्थानी संघाचा प्रयत्न असेल. त्यासाठी सर्वच खेळाडू चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करतील अशी आशा चाहत्यांना आहे. हिंदुस्थानी खेळाडूंसाठी सेन्चुरियन मैदानावर वॉर्मअप सेशन घेण्यात आलं. यावेळी सर्वच खेळाडू पराभव विसरून मजा-मस्ती करताना दिसत होते.

सेन्चुरियन मैदानावरील हिंदुस्थानी संघाचा वॉर्मअप सेशनचा व्हिडिओ समोर आला आहे. फिटनेस ट्रेनर शंकर बसू यांनी सेशन घेतलं, यामध्ये सर्वच खेळाडूंनी सहभाग घेतला. वॉर्मअप सेशनमध्ये सर्व खेळाडूंनी लाल-पिवळे रुमाल त्यांच्या पँटच्या मागे लटकवले होते. त्यानंतर सर्व खेळाडू इतर खेळाडूंच्या पँटच्या मागे कमरेला लटकवलेला रुमाल खेचण्याठी प्रयत्न करत होते.

आफ्रिकेविरूद्धच्या पहिल्या कसोटीत भारताचा ७२ धावांनी लाजिरवाणा पराभव झाला आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत आफ्रिका १-० ने आघाडीवर आहे. १३ जानेवारीला सेन्चुरियन मैदानात हिंदुस्थान-दक्षिण आफ्रिका यांच्यातला दुसरा कसोटी सामना खेळवला जाणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या