
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी इस्लामाबादस्थित डिप्लोमॅटिक कॉर्प्ससाठी आयोजित केलेल्या इफ्तार डिनरला गुरुवारी एका हिंदुस्थानी अधिकाऱ्यानं हजेरी लावली. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्तप्रसिद्ध केलं आहे.
परराष्ट्र मंत्री बिलावल यांनी हिंदुस्थानच्या अधिकाऱ्यांना निमंत्रण दिले. हिंदुस्थानने निमंत्रण स्वीकारले आणि एक अधिकारी तिथे उपस्थित राहिल्याची माहिती, सूत्रांनी एक्सप्रेस ट्रिब्यूनला दिली.