हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थेला भयंकर मरगळ! रघुराम राजन यांचा हल्लाबोल

771

दिवसागणिक वाढणार्‍या महसुली तोट्याने अर्थव्यवस्थेच्या नरडीलाच नख लावले आहे. अर्थव्यवस्थेला भयंकर मरगळ आली असून धोरणलकव्यामुळेच हे संकट ओढवल्याचा हल्लाबोल रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी केला आहे.

अमेरिकेतील ब्राऊन विद्यापीठात दरवर्षी ओ. पी. जिंदल व्याख्यानमाला आयोजित करण्यात येते. यंदा या व्याख्यानमालेत रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचे व्याख्यान झाले. हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थेला वाढत्या महसुली तोट्यामुळे घरघर लागल्याचा स्पष्ट आरोप करून राजन यांनी ही तूट अर्थव्यवस्थेला चिंताजनक अवस्थेकडे घेऊन जात आहे.

2016 च्या पहिल्या तिमाहीत विकासदर 9 टक्के होता. त्यानंतर सरकारने उत्पन्नाचे नवे स्रोत शोधले नाहीत. त्यामुळे सरकारी तिजोरीलाही दृष्ट लागली आहे. नोटाबंदी, जीएसटीसारख्या निर्णयामुळे अर्थव्यवस्थेमध्ये भूकंपच आला. या धक्क्यातून अजूनही अर्थव्यवस्था सावरलेली नाही. नोटाबंदी लागू करण्यापूर्वी आर्थिक जाणकारांचा सल्ला घ्यायला हवा होता असे रघुराम राजन म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या