हिंदुस्थानवर बेकारीचे संकट,52 टक्के कंपन्यांनी नोकरभरती थांबवली

496

आर्थिक मंदीचा फटका केवळ ऑटो सेक्टरलाच नाही तर सर्वच उद्योग क्षेत्राला बसत आहे. हिंदुस्थानातील तब्बल 52 टक्के कंपन्यांनी नोकरभरती थांबविली आहे. या कंपन्या मनुष्यबळ वाढविण्याच्या मनस्थितीत नाहीत. आगामी तीमाहीत (ऑक्टोबर ते डिसेंबर) फक्त 19 टक्के कंपन्या फ्रेशर्सना नोकऱ्या देण्याच्या विचारात आहेत.

मॅनपॉवर ग्रुप एम्प्लॉयमेंट आऊटलूक या जागतिक संस्थेने 44 देशांतील उद्योग क्षेत्रातील आर्थिक स्थिती, नवी नोकरभरती, कर्मचाऱ्यांची स्थिती याचे सर्वेक्षण केले आहे.

नव्या नोकऱ्यांबाबत हिंदुस्थान जगात चौथा

नव्या नोकऱ्या निर्माण होण्याच्या बाबतीत हिंदुस्थान हा जगात चौथ्या क्रमांकावर राहील. जपान पहिल्या, तैवान दुसऱ्या तर अमेरिका तिसऱ्या स्थानावर असेल असे या अहवालात म्हटले आहे.

सर्वेक्षण काय सांगते…

हिंदुस्थानातील 5131 कंपन्या आणि तेथील कर्मचाऱ्यांशी ऑक्टोबर-डिसेंबर या तिमाहीत आर्थिक स्थिती आणि नव्या नोकऱ्यांच्या शक्यतांबाबत चर्चा केली. अवघ्या 19 टक्के कंपन्यांनी मनुष्यबळ वाढवले जाऊ शकते असे सांगितले. सध्या आहे ते मनुष्यबळ कायम राहील. त्यात बदल होण्याची शक्यता नाही असे 52 टक्के कंपन्यांनी स्पष्ट केले. कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ करण्याबाबत सांगू शकत नाही असे 28 टक्के कंपन्यांचे म्हणणे आहे.

आपली प्रतिक्रिया द्या