कराचीमध्ये घुसले हिंदुस्थानी वायुसेनेचे ‘फायटर जेट्स’, शहर ‘ब्लॅकआउट’ झाल्याची चर्चा, वाचा काय आहे सत्य?

5233

सीमेवर पाकिस्तान शस्रसंधीचे उल्लंघन करत असतानाच हिंदुस्थानच्या वायुदलाने लढाऊ विमान सीमापार करून कराची शहरावर घिरट्या घालत असल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात आला. हिंदुस्थानी वायुसेनेचे फायटर जेट्स कराची शहरावर घिरट्या घालत असून यामुळे लोकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले. यामुळे शहर ‘ब्लॅकआउट’ झाल्याची चर्चा रंगली. सोशल मीडियावर पाकिस्तानी युजर्सने मंगळवार रात्रीपासून याबाबत ट्विट केल्याचे दिसते. मात्र सत्य वेगळेच असल्याचे समोर आले.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या मेसेजवर पाकिस्तानच्या ‘एनबीसी’चा माजी रिपोर्टर वाज खान यानेही एक ट्विट केले. ‘प्रिय हिंदुस्थान आणि पाकिस्तान, हिंदुस्थानी वायुसेनेचे लढाऊ विमान पीओके आणि सिंध-राजस्थान सेकटरमधून घुसखोरी केल्याची अफवा पसरली आहे. दोन्ही देशांनी याबाबत माहिती द्यायला हवी. माझी विनंती आहे की लोकांनी शांत रहावे, असे आवाहन रिपोर्टर खान यांनी केले.

https://twitter.com/WajSKhan/status/1270482763481825280?s=19

एवढे सगळे होऊनही सोशल मीडियावर हिंदस्थानच्या लढाऊ विमानांनी पाकिस्तानचे एफ-16 विमान पाडल्याचीही अफवा पसरली. एका युजरने तर कहर केला आणि पाकिस्तान व चीन गायब झालेल्या एफ-16 विमानाचा अरबी समुद्रात शोध घेत असल्याचेही म्हटले.

screenshot_2020-06-10-18-29-33-442_com-android-chrome

तर काहींनी आपल्याच मिसाईलने पाकिस्तानने आपलेच विमान पडल्याची अफवा पसरवली.

मात्र सत्य वेगळेच असून पाकिस्तानचे वायुदल युद्धसराव करत असून त्यातील काही विमाने कराचीवरून उडाल्याने हा गोंधळ उडाल्याचे बोलले जात आहे. हिंदुस्थान आणखी एक एअर स्ट्राईक करू शकतो अशी भीती पाकिस्तानला असल्याने वायुदलाने हा सराव आयोजित केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या