सप्टेंबरमध्ये हिंदुस्थानी फुटबॉल संघ व्हिएतनाम, सिंगापूरविरुद्ध खेळणार

हिंदुस्थानी फुटबॉल संघ येत्या सप्टेंबरमध्ये व्हिएतनाम आणि सिंगापूर या आशियाई संघांविरुद्ध दोन मैत्रीपूर्ण लढती खेळणार आहे. 24 सप्टेंबरला हिंदुस्थान सिंगापूरला भिडणार असून 27 सप्टेंबरला यजमान व्हिएतनाम संघाशी मैत्रीपूर्ण लढतीत दोन हात करणार आहे. हिंदुस्थानी संघ 22 सप्टेंबरला व्हिएतनामला जाणार असून 28 सप्टेंबरला मायदेशी परतणार आहे. 2022  एएफएफ मित्सुबिशी इलेक्ट्रिक कप स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी या दोन मैत्रीपूर्ण लढती महत्त्वाच्या ठरणार आहेत.  21 ते 27 सप्टेंबर या कालावधीतील या स्पर्धेत सर्वाधिक गुण मिळवणारा संघ विजेता ठरणार आहे. हिंदुस्थान सध्या फिफा रँकिंगमध्ये 104 व्या स्थानावर असून यजमान व्हिएतनाम  97 व्या तर सिंगापूर 159 व्या स्थानावर आहे.