माठाचा गारवा

1127

माती म्हणजे पोषक घटकांचा खजिनाम्हणूनच छोटेमोठे माठ, मडकी, विविध आकाराची भांडी परंपरागत वापरली जातातआपल्या पूर्वजांनीही मातीचे महत्त्व जाणले होते. म्हणूनच तेव्हा प्रत्येकाच्या घरी पिण्याच्या पाण्यासाठी मातीचे माठ असायचे. हल्ली तर मातीच्या बाटल्याही मिळतातमातीच्या माठातून पाणी पिण्याची परंपरा आजतागायत सुरू आहे.

थंडगार बर्फाचे पाणी उन्हाळय़ात पिणे यासारखे सुख नाही. पण माठातील पाण्याची चव आणि थंडावा काही वेगळाच असतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे माठातील पाणी तहान भागवते व त्याच्यापासून कोणतेही नुकसान होत नाही. त्यामुळे मातीच्या माठात पाणी भरून ठेवणे स्वस्त आणि पर्यावरणपूरक आहे. विशेष म्हणजे यामुळे नैसर्गिकरीत्या पाणी थंड होण्यास मदत होते. माठ बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱया मातीत मुबलक मिनरल्स आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक ऊर्जा असते. त्यामुळे मातीच्या मडक्यातील पाण्यात मातीतील गुणधर्म मिसळतात. हे पाणी प्यायल्याने शरीराला फायदा होतो.

आपल्या शरीरात विविध प्रकारची विषद्रव्ये असतात. त्यामुळेच अनेक आजार होत असतात. माती नैसर्गिकरीत्या अल्कलाईन असते. त्यामुळे मातीच्या मडक्यातील पाण्यात अल्कलाईन मिसळते. त्यामुळे मडक्यातील पाणी अल्कलाईनयुक्त होते. असे पाणी प्यायल्याने शरीरिक आरोग्य सुदृढ राहते. जास्तीत जास्त प्लॅस्टिकच्या बाटल्यांमध्ये बीपीए नावाचे टॉक्सिक रसायन असते जे आरोग्याला धोकादायक असते. म्हणून मातीच्या बाटल्या, मडके किंवा घागरीत पाणी ठेवणे आरोग्यदायी आहे.
हे पाणी दूषितही होत नाही.

उष्माघात टाळते

उष्माघात, डिहायड्रेशन असे त्रास उन्हाळ्यात बऱयाच जणांना सर्रास होत असतात. या त्रासांना आळा घालण्यासाठी मातीच्या माठातले पाणी पिणे सुखकर ठरते.

घसाविकारांपासून सुटका

सर्दी, खोकला, अस्थमा, घसा सुजणे या विकारांवर माठातील पाणी त्याच्यातील नैसर्गिक आरोग्यदायी घटकांमुळे गुणकारी आहे. नैसर्गिकरीत्या थंड झालेले पाणी प्यायल्याने घशाच्या आजारांपासून सुटका होते.

योग्य माठाची निवड कशी कराल?

मातीचा माठ विकत घेताना शक्यतो तो हाताने बनवलेला असावा. मातीमध्ये  मिका पार्टिकल्स हे रसायन मिसळून तयार केलेला असावा. त्यामुळे पाणी थंड राहण्यास मदत होते, असे तज्ञांचे म्हणणे आहे. वाळा, एखादे मोगऱयाचे फूल रात्रभर माठातील पाण्यात घालून ठेवावे. सकाळी थंडगार, सुगंधी पाणी पिऊन पहा… कसे लागते.

आपली प्रतिक्रिया द्या