#Coronavirus कोरोनातून बरे झाला असाल तर असा ठेवा आहार, केंद्राचा नवीन डाएट प्लॅन

कोरोना रुग्णांनी योग्य औषधोपचारांबरोबरच योग्य आहार घेणे आवश्यक आहे. आहारातून शरीराला आवश्यक पोषक तत्व मिळत असल्याने शरीराला सुदृढ राहण्यास मदत मिळते. नुकतेच केंद्र सरकारने कोरोना रुग्णांसाठी नवीन डाएट प्लॅन दिले आहे. कोरोना रुग्णांना त्याची मदत होईल.

भिजवलेले बदाम आणि बेदाणे

बदामात प्रोटीन आणि लोहाचे चांगले प्रमाण असते. भिजवलेले बदाम खाल्ल्याने पचनशक्ती सुधारते. कारण भिजवलेल्या बदामाच्या सालींमध्ये असणारी एन्झाइम्स शरीरातील मेद कमी करण्यास मदत होते. भिजलेले बेदाणे खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. पोट साफ राहते. हाडे मजबूत होतात. तसेच शरीरातील लोहाची कमतरता दूर होते.

फायबरयुक्त आहार घ्यावा

कोरोनाचे संक्रमण झालेल्या रुग्णांनी आहारात फायबरयुक्त आहार घेणे आरोग्याच्यादृष्टीने चांगले असते. पचनशक्ती वाढवण्यासाठी आहारात फायबर असलेल्या पदार्थांचा समावेश करावा. सकाळी न्याहारीत नाचणीचा डोसा आणि एक वाटी गव्हाची जाडसर भरडीची खीर करून खायची. याने फायबरयुक्त आहार मिळतो. हा आहार पचनक्रिया नीट होण्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त आहे.

गुळ आणि तूप खा

कोरोना रुग्णांना अशक्तपणा येत असल्यास त्यांनी गुळ आणि तूप खायला सुरुवात करा. दुपारच्या जेवणात चपातीला तूप लावून गुळ घेऊन ते खाऊ शकता. या आहाराने शरीरात उष्णता टिकून राहते आणि रोगप्रतिकारशक्ती चांगली होते. घशाचे संक्रमण बरे होते.

रात्रीच्या जेवणात खिचडी

कोरोना संक्रमित रुग्णांनी काहीकाळासाठी हलका आहार घेणे केव्हाही चांगले असते. अशावेळी रात्रीच्या जेवणात खिचडीचा समावेश करावा. रात्रीच्या जेवणातच खिचडी भात खाल्ल्याने अपचनाचा त्रास होत नाही तसेच डायरिया सारखे आजारापासून आराम मिळतो. तसेच अशक्तपणाही दूर होतो.

हायड्रेट ठेवणं गरजेचे

कोरोना काळात शरीराला हायड्रेट ठेवणं अंत्यंत आवश्यक आहे. जास्तीत जास्त पाणी पिणे गरजेचे आहे, त्याचबरोबर लिंबू सरबत, ताक याचेही सेवन करावे. याने रोगप्रतिकारशक्ती चांगली होते.

प्रोटीनयुक्त आहार

कोरोनामुळे शरीराला अशक्तपणा येतो. अशावेळी रुग्णांनी प्रोटीनयुक्त आहार घेणे आवश्यक आहे. त्यामुळे चिकन, अंडी, मासे, पनीर आणि सोयाबीनचे पदार्थ आहारात असावे.

डार्क चॉकलेट

सेल्फ आयसोलेशमध्ये राहत असलेल्या रुग्णांना तणाव, एन्झायटीसारखा त्रास होतो. अशा लोकांनी डार्क चॉकलेट सोबत ठेवावे. 70 टक्के कोको असलेले चॉकलेट खाऊ शकता.

हळदीयुक्त दूध

रोगप्रतिकारशक्ती चांगली करण्यासाठी रोज हळदीयुक्त दूध प्यावे. हळदीमध्ये अँटीव्हायरल, अँटीफंगल गुण असतात. ज्यामुळे सर्दी, ताप, खोकला यासारख्या विकारावर हळद गुणकारी ठरते.

अक्रोड, मोहरी, बदाम, ऑलिव्ह ऑईलचा वापर करा

कोरोना रुग्णांसाठी जेवणात वापरण्यात येणारे तेलही महत्वाचे आहे. तेल वापरण्याबाबतही काळजी घेणे गरजेचे आहे. जेवणात अक्रोड, मोहरी, बदाम किंवा ऑलिव्ह ऑईलचा वापर करावा.

आपली प्रतिक्रिया द्या