दीपिकाने मारला पुरणपोळीवर ताव

1463

छपाक चित्रपटाच्या निमित्ताने दीपिका पदुकोणने ‘इंडियन आयडॉल ११’च्या सेटवर नुकतीच हजेरी लावली. यावेळी दीपिकाचा पॅâन असलेला स्पर्धक रोहित राऊतने खास दिपीकासाठी पुरणपोळ्या आणल्या होत्या. दीपिकाने सेटवरच या पुरणपोळ्यांवर ताव मारला. दीपिकाचा ‘छपाक’ हा चित्रपट ३ जानेवारी २०२० रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ती ‘इंडियन आयडॉल’च्या सेटवर आली होती. ‘मी पुरणपोळीचा आस्वाद घेत गाणी ऐकत होती. अशा क्षणांचा आनंद लुटताना आयुष्यात आणखी काय हवं?’, अशी भावना दीपिकाने व्यक्त केली. रोहितच्या आवाजातील सुरेल गाणी ऐकून दीपिकाने ‘लय भारी’ म्हणत त्याची स्तुतीसुद्धा केली. विशेष म्हणजे दीपिकाच्या ‘छपाक’ चित्रपटात रोहितची बहीण श्रावणी देशपांडे एका पत्रकाराची भूमिका साकारत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या