आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करायचंय!

रिऑलिटी शो ‘इंडियन आयडॉल-12’मधून मराठमोळी स्पर्धक अंजली गायकवाड नुकतीच बाहेर पडली. पॉवर प्लेमध्ये कमी मते मिळाल्याने अंजली स्पर्धेबाहेर गेली. त्याबद्दल तिच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे. अंजलीने आपल्या गाण्यावर प्रेम करणाऱया सर्व चाहत्यांचे आभार मानले आहेत. ‘‘हा सर्व प्रवास अद्भुत होता. अनेक सुंदर आठवणी माझ्यासोबत आहेत,’’ अशी प्रतिक्रिया तिने दिली. तसेच यापुढे शास्त्राrय संगीताचे प्रशिक्षण सुरू ठेवून आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करणार असल्याचे सांगितले.

मूळची नगर जिह्यातील असलेल्या अंजलीने वडिलांकडून शास्त्राrय संगीताचे धडे गिरवले आहेत. लहान वयापासून ती संगीत शिकत आहे. तिने 2017 साली ‘सारेगमप लिटिल चॅम्प’ स्पर्धेचे विजेते पद मिळवले होते. इंडियन आयडॉलच्या 12व्या सिझनमध्ये तिने आपल्या शास्त्राrय गायनाने सर्वांना खूश केले होते. लेडी तानसेन असे तिला संबोधण्यात येत होते. अशातच रविवारच्या भागात अंजलीला कमी मतांमुळे स्पर्धेबाहेर जावे लागले. त्यामुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. आपल्या पुढच्या वाटचालीबद्दल अंजली म्हणाली, मी वडिलांकडून शास्त्राrय संगीताचे धडे घेत राहीन, कारण या संगीत प्रकारात मला पुढे जायचे आहे. माझे वडील माझे गुरू आहेत. त्यांच्यामुळेच मी इथवर पोहोचले. आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करून मोठी गायिका बनायचे आहे.

रेहमान यांची शाब्बासकी

शोदरम्यानची सर्वात चांगली आठवण सांगताना अंजली म्हणाली की, एकदा ए.आर. रेहमान म्हणाले, ‘‘जेव्हा वेळ मिळतो तेव्हा ते मी गायलेली गाणी ऐकतात. ते खरोखरच असे म्हणाले का, याची खात्री करण्यासाठी मी स्वतŠला अक्षरशŠ चिमटा काढून बघितला. त्यांचे प्रोत्साहनपर शब्द ऐकून माझे मनोबल खूप वाढले.’’

आपली प्रतिक्रिया द्या