पाकिस्तानमध्ये हिंदुस्थानी नागरिकाला अटक

सामना ऑनलाईन। इस्लामाबाद

पाकिस्तानमधील इस्लामाबाद येथे एका हिंदुस्थानी नागरिकाला अटक करण्यात आली आहे. नबी शेख असे त्याचे नाव असून तो मुंबईचा आहे. त्याच्याजवळ आवश्यक ती प्रवासी कागदपत्रे नसल्याने त्याला अटक करण्यात आल्याचे पाकिस्तानी मिडियाने म्हटले आहे. पाकिस्तानच्या न्यायालयाने त्याला १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

नबी याला इस्लामाबाद मधील एफ -८ या भागातून अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर परदेशी नागरिक कायदा १९४६ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. आंतराष्ट्रीय न्यायालयाने माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती दिल्यानंतर लगेचच नबी यास अटक करण्यात आल्याने पाकिस्तान सूडाचे राजकारण करत असल्याचे बोलले जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या